• फोन: ०२३६२ २२२५०८
  • श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव :- परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज पुण्यतिथी - ३१ जानेवारी परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांची जयंती - १३ मार्च परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांची पुण्यतिथी - १६ मे परमपूज्य श्री समर्थ गुरूकाका जयंती - १ जुन परमपूज्य श्री समर्थ गुरूकाका पुण्यतिथी - ३ जुन आषाढ पौर्णिमेला - श्रीगुरूपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला - परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला - श्रीदत्तजयंती

।। गुरूमंत्र ।।

।। गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वरा ।
गुरू: साक्षात्‌ परब्रम्ह: तस्मै: श्री गुरूवे नम: ।।

|| आम्ही तुमच्या पाया पडाचा ||

पिंगुळी क्षेत्र म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांच्या कृपाशिर्वादाने परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज यांनी घडवलेले ‘भक्तपीठ’.
३१ जानेवारी १९८५ साली परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांनी आपला देह ठेवला आणि पिंगुळी क्षेत्री समाधिस्त झाले. यानंतर १९८६ साली परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांनी, परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांना दिलेल्या दृष्टांतानुसार परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांची भक्ती, त्यांच्या कर्तव्यपालनातून सुरू झाली आणि अजूनही ती अविरत चालू आहे. यातूनच पिंगुळी क्षेत्राची कायापालट, विठ्ठल-रखुमाईमंदिराच्या पंढरपूरात अवघ्या अंतरावर वसवलेले 'परमपूज्य श्रीराऊळमहाराज स्मृती स्मारक मंदिर व भक्तनिवास' आणि साठेली भेडशी येथील राऊळबाबांचे मंदिर अशा प्रतिभावंत वास्तू उभ्या राहील्या.
परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे पिंगुळी क्षेत्र प्रत्येक भक्तजनासाठी आध्यात्मिक स्थळ बनलेले आहे. सद्‌गुरूंच्या या पवित्र आश्रमात आध्यात्मिक, सांस्कृतिक विविध उपक्रम राबविले जातात. काही वार्षिक उत्सव आणि दैनंदिन धार्मिक पूजाविधी यासाठी महाराष्ट्रातील, भारतातील आणि परदेशातील भक्तगण विविध प्रकारे मदत करतात. येथे येणा­या भक्तजनांना आणि श्रद्‌धाळू पर्यटकांना या तीर्थक्षेत्राची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून हे संकेतस्थळ तयार केले. सर्व भाविकांना आपल्या सर्व स्थानातील अनेक कार्यक्रमात सहभागी होता यावे या सद्‌हेतूने ही माहीती देण्यात येत आहे.
आपण तन, मन आणि धन याने सुख, शांति आणि समाधानाचे धनी व्हावे ही सद्‌गुरूचरणी विनम्र प्रार्थना!


|| ॐ नम: शिवाय राऊळनाथाय नम: ||

पिंगुळी मठाबद्दल

५८ वर्षांच्या गुरूसेवेत परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांच्या या जन्मभूमीला परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी आपली तपोभूमी, कर्मभूमी करत जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविले.

पंढरपूर क्षेत्र

“परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज स्मॄती स्मारक मंदिर आणि भक्तनिवास” (“परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज स्मॄती स्मारक”) याचे भूमीपूजन दि.२ डिसेंबर २००७ रोजी झाले.

पिंगुळी क्षेत्र

परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या २९ व्या पुण्यतिथीदिवशी दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी माननीय सुवर्णा आमोणकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

श्रीदत्तमंदिर

दि.८ डिसेंबर २००३ या दिनी श्रीगणपती, श्रीदत्त व श्रीशिवशंकर या तिन्ही मूर्तीची प्रतिष्ठापना मराठी अभिनेत्री सौ. अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आली.