कोकणातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात जन्म घेतलेल्या परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराज यांनी आपल्या कोकणनगरीत, गोवा प्रांतात, मुंबई शहरात अध्यात्मिक वैभव समृद्ध व संपन्न केले. आपल्या एकतारी वाद्याची तार अंतिमसत्याशी जुळवून त्यातून भावकोमल संगीत व्यक्त करत साक्षात्काराची आणि सत्यदर्शनाची अनभुतीसर्व भक्तगणांस दिली.
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांचा कृपाशिर्वाद सदैव परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांवर असल्याने प्रत्येक कर्म पुण्यकारक झाले. सर्व भाविकांस आनंदाचे ब्रम्हरसाचा महाप्रसाद वाढून तृप्त केले आणि नीतीचा, सदाचाराचा मार्ग दाखविला.
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराज स्वत:ला भक्तांचा ‘झाडुवाला’ म्हणवून घेत, सर्व भक्तांचे षड्रिपू झाडण्याचे काम अविरत करत आहेत.
जन्म
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांचा जन्मपिंगुळी गावात १३ मार्च १९४५ रोजीझाला. जन्मदिवस विनायकीचतुर्थीचा होता. परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराज नामकरण विधीला उपस्थित होते. परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांचा जन्म विनायकीचतुर्थीचा असल्याने परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांनी त्यांचे नाव 'विनायक' असे ठेवले.
पिताश्रींचे नाव दत्तारामबाबा आणि मातोश्रींचे नाव सरस्वती होते. आईचा हृदय मंदिराचा गाभारा प्रेमभक्तिने भरून गेलेला होता. आई परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांच्या सेवेत रात्रंदिवस असे.
शिक्षण
१७ दिवसांची हजेरी लावणारे आपले परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराज शाळेत रमले नाही. गुरे राखणे हा त्यांचा आवडीचा छंद, मनापासून जोपासला. नंतर १४ व्या वर्षी ते परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांच्या आईच्या दुकानात काम करू लागले.
बाजूच्या खोलीत परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांचा ध्यानाचा नित्यक्रम चालू असायचा, त्यातूनच त्याची सेवा करत अध्यात्मिक ओढ महाराजांना लागली.
आज जे आपण अनुभवतो ते भक्तितून मिळालेले ज्ञान. आज सर्व मंदिरांची आंतरीक व बाह्यरचना सर्व काही भक्तिमार्गातून मिळालेल्या ज्ञानातून आणि नि:संदेह कठोर परिश्रमातून उभारी घेऊन आपली लोचने दीपून टाकत उभी आहेत.
आज जेवढी काही बांधकामे, मग ती पिंगुळीतील असो वा पंढरपूरचे असो अथवा साठेलीभेडशीचे असो, सर्वाचे आर्कीटेक, इंजिनिअर स्वत: परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराज आहेत. यासर्व वास्तू गुरूप्रेमाची साक्ष देतात.
विवाह
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांची धर्मसहचारिणी परमपूज्य बाईमा, कुणकेरी गावातील श्री. अंकुश परब यांच्या सुकन्या. १६ मे १९७१ साली सकाळी १० वा. २५ मि. च्या मुहूर्तावर महाराज आणि बाईमा विवाहबद्ध झाले. परमपूज्य राऊळबाबा आणि परमपूज्य अण्णामहाराज यांनाच गुरूस्थानी ठेऊन
त्यांच्या सेवेत राहून प्रपंच आज पण तेवढयाच जबाबदारीने आणि उत्सुकतेने सांभाळत आहेत. त्यांची तिन्ही मुले आपापली कामे सांभाळीत महाराजांना गुरूस्थानी ठेऊन गुरूसेवेत पूर्णत:विलीन आहेत.
पिताश्री व मातोश्रींचे निधन
महाराजांचा प्रपंच सुख-दु:खाच्या धाग्याने विणलेला होता. आपल्या आई-वडिलांवर अतिशय प्रेम होते. सर्वप्रथम पिताश्रींचे निधन माघ शुद्ध एकादशी १९९८७ साली झाले.
प्रपंच नाशवंत आहे हे महाराजांनी जाणले होते. फक्त जन्मदात्या आईच्या सेवेत आणि परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांच्या सेवेतच रमले.
२०१४ सालात मातोश्री महाराजांना सोडून गेली. आईचे दु:ख त्यांना न भावणारं होतं. महाराजांनी सद्गुरूंचे काम आपल्या पूजनीय सरस्वती मातेचा आशीर्वाद घेऊनच पुढे अविरत चालू ठेवलेले आहे.
सद्गुरू उपदेश
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांनी आपल्या या शिष्योत्तमाला आपला आध्यात्मिक उत्तराधिकारी केला. पैसा,सोने विष आहे, प्रपंच नाशवंत आहे, त्यापासून दूर राहाण्याचा उपदेश परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांनी पहिल्यांदाच दिला होता. आज परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराज हा उपदेश तंतोतंत पाळताना दिसतात.
अन्नदान श्रेष्ठ दान मानत आजही ते कार्य अविरत चालू आहे.
‘काम तेथे राम’ असा उपदेश करत कोणालाही प्राथमिक कर्तव्या पासून दूर जायला देत नाहीत. आम्हा भक्तजनांस उपदेश करताना सांगतात की ‘आर्इ’ सर्वात श्रेष्ठगुरू आहे. याची जाण आम्हा भक्तांस वारंवार करून देतात.
विश्वमंदिर कर्मपूजा | चराचरावर प्रेम करा |
सदाचार हा मोक्ष असे | स्वर्ग सुखामध्ये शांती नसे|
अनंत रूपे प्रभू हा नटला | शुद्धभावाने पहा तयाला ||
ज्ञानेशाला प्रसाद लाभला | शुभ भक्तिने आनंद झाला ||
भक्तिचे स्वरूप
परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांचा भक्तिमार्ग, निर्हेतूक कर्मात भगवंत असतो, अशा विचारातून सुरू झाला. परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांच्या चरणापाशी महाराज जवळजवळ पाच तप पूर्ण करणार आहेत. पिंगुळी एक पावन भूमी बनविण्याचे कार्य हे या भक्तिच्या स्वरूपाचे एक अंग आहे. वयाच्या १५ व्या वर्षा पासून महाराजांनी गुरूसेवा व गुरूचा प्रत्येक शब्द हा आज्ञा समजून त्याचे तंतोतंत पालन केले. गुरूकॄपा हे महान शास्त्र आहे.
दि. १८ मार्च २०१८ रोजीपासून (गुढीपाडवा) सुरू केलेले अन्न त्यागाचे कडक व्रत त्यांनी बरोबर १३ महिने सुरू ठेवले. या दरम्यान ते फक्त एक ग्लास दुध व ५ ग्लास गरम पाणी घेत. हे त्यांचे अन्न त्यागाचे व्रत आणि दररोज ८०० ते १००० पर्यंत रक्तातील साखरेची पातळी असून देखील ते वयाच्या ७४ व्या वर्षीही सतत कार्यरत आहेत. हे सर्व त्यांच्या अध्यात्मिक तेजाची जाणीव देतात.
महाराज स्व:त कडून घडत असलेले कार्य परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराज करवून घेत आहेत असा भाव नेहमीच प्रकट करत असतात.
महाराष्ट्रातील चौथा आणि पाचवा ‘अतिरूद्र स्वाहाकार’ या परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराजांच्या पुण्य भूमीवर परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांनी आपल्या अधिपत्त्याखाली दिडशे वर्षांनंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जात यशस्वीपणे संपन्न केले. असं म्हटलं जातं की हा ‘अतिरूद्र स्वाहाकार’ करताना शिवशंभो भरपूर परिक्षा घेतात. चौथा ‘अतिरूद्र स्वाहाकार’ विधी चालू होणार एवढ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू अण्णामहाराजांनी या अवकाळी पावसाला आपले हात उंचावून त्या पावसाचे काही थेंब प्राशन करून रोखले. नंतर पिंगुळी परिसरात १ किमी अंतरावर पाऊस पडला नाही. बाकी इतर ठिकाणी आजूबाजूला पावसाने थैमान घातले होते.
चमत्कार आजही घडतात.
परमात्मा सर्वस्वतंत्र आहे. सर्वसमर्थ आहे आणि सर्वज्ञ आहे. प्रत्येकाने आपापल्या शारीरीक, मानसिक, पारिवारिक, आर्थिक परिस्थिती नुसार साधना पद्धत स्वीकारा, असा उपदेश परमपूज्य श्री. समर्थ सद्गुरू राऊळमहाराज आम्हा सर्वांस देतात.
मनुष्यदेह एक नौका आहे. सद्गुरू या नौकेचा कर्णधार आहे. र्इश्वरी कॄपा म्हणजे अनुकूल वारा आहे. सद्गुरूचरणी दॄढश्रद्धा असेल तर पैलतिरी नेणे हे नौकेचे कार्य सहजरित्या घडते आणि या संसारसागराच्या पलिकडे पोहोचविणे हे मानवदेहाचे कार्य याला पण अघटित गती प्राप्त होते.
|| ॐ नम: शिवाय राऊळनाथाय नम: ||