• फोन: ०२३६२ २२२५०८

परमपूज्य श्रीसद्‌गुरूसमर्थ राऊळमहाराजांची आरती

ओवाळू आरती राऊळनाथा
कैवल्यतेजा परब्रम्ह रूपा || धॄ ||
चिदानंदस्वरूपा तू आज संता
निजपाद स्पर्शे तारी पतिता
या विश्वभूवनी तू संत श्रेष्ठा || ओवाळू ||
दिगंबरी तू काय भगवंता
परदु:खियांची तुजलागी चिंता
सकला मुखी आज
तव नामा गाथा || ओवाळू ||
संतुष्ट करिशी निजआप्त भक्ता
समयी प्रगटसी तूही अनंता
सकल दु:ख पिडीता
तू सुखदाता || ओवाळू ||
हाती धरोनी निज दासबोधा
झिडकारले तू जरी कामक्रोधा
सदा तव मनी भाव
भोळाची साधा || ओवाळू ||
अलंकार भूषणे लेवोनि नटसी
परि ते पिडीता सर्वस्व लूटसी
गुणगान महिमा कळू न ये साचा || ओवाळू ||
पिंगुळीवासी अवतारी दत्ता
या विश्वभूवनि तुझी सर्व सत्ता
तव पादकमली ठेवी मी माथा || ओवाळू ||

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव