श्रीक्षेञ पिंगुळी येथील वाढदिवस योजना
१. कुठल्याही भाविक भक्ताचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस किंवा मृत व्यक्तिचे पुण्यस्मरण या प्रित्यर्थ श्रीसमर्थ संजीवन समाधीसमोर त्या व्यक्तिचा नामउल्लेख त्यादिवशी ब्राम्हणाकरवी मंञविधिपूर्वक अभिषेक केला जातो. एक दिवस अगोदर फोन करून तो भाविक पिंगुळी क्षेञी येणारा असल्यास त्याच्याहस्ते अभिषेक केला जातो अन्यथा फोनवरून त्याला अभिषेकाचे मंञ ऐकवले जातात.
२. दुपारचा नैवैद्य महाप्रसादापूर्वी दाखविला जातो. ती व्यक्ति पिंगुळी क्षेञी हजर असेल तर नैवैद्य त्याच्याहस्ते दाखविला जातो.
३. संध्याकाळी आरतीनंतर त्या व्यक्तिचे औक्षण करून भक्तांच्या मेळाव्यात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.
४. जे हजर नसतील त्यांना प्रसाद आणि विभूती पोस्टाने पाठविण्यात येते.
५. वरील सर्व लाभ रू. १०००/- फक्त या नाममाञ देणगीतून होतात.
विशेष सूचना: वाढदिवस योजनेत सहभागी होण्यासाठी पुढील दूरध्वनीवर संपर्क साधा
दूरध्वनी क्रमांक - ०२३६२ - २०२५०८
किंवा
येथे क्लीक करा.