पंढरपूर क्षेत्र भक्तनिवास
“परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज स्मॄती स्मारक मंदिर आणि भक्तनिवास” याचे भूमीपूजन दि.२ डिसेंबर २००७ रोजी झाले. नंतर ५ मे २०१० रोजी या वास्तूचे “परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज स्मॄती स्मारक” असे नामांतर करून त्याचे उदघाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री. दिगंबर नाईक व श्री. सुधाकर परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यानंतर दिड वर्षातच म्हणजे ३० ऑक्टोबर २०११ ला विनायकी चतुर्थी दिवशी सर्व भाविकांना राहाण्यासाठी ते खुलं करण्यात आले.
परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज पंढरपूरची वारी नेहमीच करायचे.आपल्या सद्गुरूचे छोटेसे मंदिर आणि भक्तनिवास या पंढरपूरातील विठ्ठलरखुमाईच्या मंदिराजवळ असावे, असे परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजाना मनोभावे वाटत असे आणि या सद्विचारातून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ बांधली गेली. सर्व प्रांतातील भक्तगणांनी,
विशेषत: गोव्यातील भक्तगणांनी मोलाचा हातभार लावला आणि हा प्रकल्प पूर्णत्वास आला.
त्या ५० वर्षांच्या परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या गुरूसेवेवर प्रसन्न होऊन परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांनी आपले स्मॄती स्मारक मंदिर आणि त्याबरोबर भक्तनिवास पंढरपूर क्षेत्री प्रस्थापित केले.
निवास व्यवस्था
खोली प्रकार |
खोली संख्या |
एकूण व्यक्ति |
ए.सी. |
१४ |
४ |
नॉन ए.सी. |
१८ |
४ |
हॉल प्रकार |
हॉल संख्या |
एकूण व्यक्ति |
डॉर्मेटरी-बेड/सतरंजी |
१ |
२५० |
पिंगुळी क्षेत्र भक्तनिवास १
परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या २९ व्या पुण्यतिथीदिवशी दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी माननीय श्री. सुवर्णा आमोणकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सर्व प्रांतातील भक्तगणांनी मोलाचा हातभार लावला आणि हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.
परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ३० व्या पुण्यतिथीदिवशी दि. ३१ जानेवारी २०१५ दिवशी या सभामंडपाचे आणि भक्तनिवासाचे उद्घाटन करून सर्व भाविकांना राहाण्यासाठी खुलं करण्यात आले.
सभामंडप आणि भक्तनिवास यासाठी सर्व जमीन परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराज आणि राऊळकुटुंबियांनी परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज सेवा ट्रस्टला विनामूल्य अर्पित केली.
निवास व्यवस्था
खोली प्रकार |
खोली संख्या |
एकूण व्यक्ति |
ए.सी. |
४ |
४ |
नॉन ए.सी. |
२० |
४ |
नॉन अॅटॅच बाथरूम |
४ |
४ |
हॉल प्रकार |
हॉल संख्या |
एकूण व्यक्ति |
|
१ |
|
पिंगुळी क्षेत्र दत्तभक्तनिवास २
खोली प्रकार |
खोली संख्या |
एकूण व्यक्ति |
ए.सी. |
० |
० |
नॉन ए.सी. |
१४ |
४ |
नॉन अॅटॅच बाथरूम |
८ |
४ |