• फोन: ०२३६२ २२२५०८

आई पिंगुळीची - परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांची सहधर्मचारिणी

डॅा. सुजाता विनय पाटील या आपल्याच शब्दात आम्हा सर्वांची माऊलीचे वर्णन करताना लिहितात -

रूप ते सावळे परि सोज्वळ सात्विक मूर्ती |
ओसंडून वाहे प्रिती तिच्या निर्मळ नयनी |
स्नेह झिरपतो सदा तिच्या पवित्र हृदयी |
वावरी ती राऊळी सदा सुहास्य वदनी |
पिंगुळीग्रामीची ती असे प्रेमळ माऊली |
गुरुअण्णांची ती असे प्रिय शीतल साऊली ||धृ||

तरारती वृक्षवेली तिच्या दर्शनानी |
बहरती ते प्रेमानंदे फळाफुलांनी |
कृध्दीत श्वान शांत होती, ऐसी तिची दृष्टी |
सारी सृष्टी गाणी गाती किलबिल करिती पक्षी |
आसुसती सकल पशु तियेच्या प्रीती भेटीलागी |
तयांना भासे ती आपुलीच जननी ||१||

उच्च–नीच भेद न करी कदापि |
सर्वां सामावून घेई अपुल्या प्रेमळ हृदयी |
मितभाषी असे परी मग्न राही कामी |
कृतीतुनी जना शिकवी धर्म सेवाभावी |
प्रिय असे परी तिला भक्ती राऊळांची |
सकलजन प्रेमाने म्हणती तिला बाई ||२||

हाव नसे तिजला कनकधनसंपत्तीची |
मान - सन्मानाची तिजला न लगे प्रीती |
सदा सांगे सकल भक्ता वंदन करी |
प्रथम तवं गुरुअण्णा चरणी |
अण्णांची असे ती सहधर्मचारिणी |
सांगती अण्णा सकल भक्ता तिची महती ||३||

अण्णाभोवताली सदा असे भक्तांचा गोतावळा ।
परि आई रमे संसारी संगे बाळगोपाळा ।
झिरपती सदा हृदयी परि गुरूभक्तीचा उमाळा ।
हा भक्त असे जगावेगळा परि नसे गुरूवेगळा ।
तेजाने त्या गुरूकृपेच्या देह तिचा उजळिला ।
गुरूअण्णांची असे ती प्रियोत्तमा शिष्या ।। ४ ।।

कोपती अण्णा प्रेमे जरि भक्तालागी ।
ती राहे स्थिर जशी मूर्ती शांतीची ।
तेजाने सुर्याच्या अण्णा तळपती ।
ती असे तव छाया शीतल चंद्रापरि ।
रूप वेगळे तरी हृदयी एकरूपी ।
अवनीवरती खेळ खेळती संगे शिवपार्वती ।। ५ ।।

एकच आत्मा परि वसे दोन देही ।
भाव असे एकच परि कृती करी वेगळी ।
अण्णा-आई एकरूपी पिंगुळी नांदती ।
सकल भक्ता सुकृते अण्णाई लाभती ।
'अण्णाई' लाभती.......................।। ६ ।।

-डॅा. सुजाता विनय पाटील

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव