परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी आपल्या भक्तिमार्गातून सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडले.
परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी स्वकष्टातून विहीरी उभारल्या. आजूबाजूच्या नद्या-ओहोळांना दिवाळीच्यासुमारास बंधारे बांधून पाणी अडवून त्याचा उपयोग बागायती शेतीसाठी,
मे महिन्यात पडणा-या पाण्याच्या दुष्काळापासून वाचण्यासाठी केला जात असे. शासनाच्या मदतीने जनजागृती करत नळयोजनेव्दारे पिण्याचे पाणी पोहोचवून पिंगुळी गाव टॅंकरमुक्त केला.
२००१ साली पिंगुळी गावी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी समिती स्थापन केली व त्या समितीच्या अध्यक्षपदी परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांची निवड करण्यात आली.
आपल्याबरोबर ३० ते ४० ग्रामसेवक घेऊन स्वत: हातात झाडू, फावडे, टोपल्या घेऊन स्वच्छता अभियान राबवले. या कामची दखल संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानतर्फे पुरस्कार देऊन घेण्यात आली.
लोकांना मार्गदर्शन करत पिंगुळी गावाला गांव, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर जवळ जवळ ८५ लाख रूपये इनाम रूपाने मिळवून दिले आणि गावची किर्ती सर्वदूर पसरवली.
पिंगुळी गावाला मिळालेले पुरस्कार-
श्री. परमपूज्य अण्णामहाराज चॅरिटेबलट्रस्टव्दारे शालेय उपक्रम, वैद्यकिय उपचार, धान्यवाटप, व इतर बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात.
श्री. परमपूज्य सद्गुरू समर्थ राऊळमहाराजसेवा ट्रस्ट व श्री. परमपूज्य अण्णामहाराज चॅरिटेबल ट्रस्टकडे जमा होणारा काही निधी सामाजिक कार्यासाठी सर्व कायद्यांचे पालन करत वापरला जातो.