पिंगुळी ग्रामी वसे एक योगी ब्रम्हाडांचा ।
सारे जन प्रेमे म्हणती अण्णा अण्णा ।
वावरती ते सकल जना होऊनी एक सखा ।
परि भासू न देती अपुल्या ईशरूपा ।। धृ ।।
असू आम्ही दंग परि संसारी विषयी ।
भिती वाटतसे आम्हा परि संकटाची ।
आळविता मनोभावे परि भगवंताशी ।
सत्वर अण्णा येऊनी पाठी उभे राहती ।। १ ।।
सांगती सदा ते सर्वोतपरी ।
भीती बाळगी न तू उरी ।
दु:खाशी तू लढ सत्वरी ।
मी उभा आहे तुझ्या पाठीशी ।। २ ।।
आम्ही जरी असू बहु अडाणी ।
परि जाणतो आम्ही तयाची करणी ।
तारण्या येती आम्हा श्री अण्णा हरी ।
लाभती आम्हा सद्गुरू श्री अण्णारूपी ।। ३ ।।
अण्णा असती योगीयांचा योगी ।
सकल जनांचा भयदु:खहारी ।
भ्रमण करीती सदा भक्तालागी ।
तारिती भक्ता घेऊनी दंडा हाती ।। ४ ।।
आम्ही जन असु बहु पुण्यपावन ।
भेटती अण्णा आम्हा न करिती सायास ।
उजळती सारे विश्व ऐसे त्याचे तेज ।
योगीयाचा राज असे अण्णा महाराज ।। ५ ।।
-डॅा. सुजाता विनय पाटील