• फोन: ०२३६२ २२२५०८

पिंगुळी मठाचा इतिहास

सिंधुदूर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रम्हयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज. लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्‌गुरू नामस्मरणात रंगून जात. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्‌गत होती. ते १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत, एकावेळी २ ते ३ महिने काहीही प्राशन न करता करत असत. त्या काळात जगात ‘आई श्रेष्ठ’ याचेच प्रबोधन ते जास्त करत आणि तीच शिकवण परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आज भक्तजनांना देतात.

परमपूज्य श्रीसमर्थ राऊळ महाराज

परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज रूढ अर्थाने परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांचे पुतणे. आध्यात्मिक वारसदारच ते. परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाल्यापर्यंत म्हणजे १९८५ पर्यंतची २५ वर्षे प्रत्यक्ष गुरूसेवा आणि नंतरची आजपर्यंतची ३३ वर्षे एवढी अखंड गुरूप्रेरित गुरूसेवा. या ५८ वर्षांच्या गुरूसेवेत परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराजांच्या या जन्मभूमीला परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी आपली तपोभूमी, कर्मभूमी करत जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविले. 'अन्नदान सेवा' ही सद्‌गुरूंची आज्ञा पाळत परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आजपर्यंत अहोरात्र अन्नदान करत आहेत. पिंगुळीवासी दत्तावतारी राऊळस्वरूपी परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांच्या पदस्पर्शाने येणाऱ्या अनुभूती आजही भक्तजन अनुभवत आहेत.

परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज परमपूज्य श्रीसमर्थ राऊळ महाराजांसमवेत

पिंगुळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी जांनी ज्या छोटया खोलीत ध्यानधारणा केली, तेथेच परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी राऊळबाबांचे समाधीमंदिर तेथेच उभारले आहे. या समाधीमंदिर व श्रीदेवी माउली मंदिर या दोघांच्या मध्ये उभा असलेला औदुंबर वॄक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या आजपपर्यंतच्या ५८ वर्षांचा आध्यात्मिक प्रवासाचा साक्षी आहे.

परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला १३ मार्च १९९५ ला श्रीगौरीशंकर मंदिराची स्थापना झाली.

राऊळघराण्याला सत्पुरूषांचा वारसा लाभलेले परमपूज्य श्री समर्थ गुरूकाकामहाराजांच्या मंदिराची स्थापना त्यांच्या देहवासानंतर २००२ साली करण्यात आली.

परमपूज्य श्री समर्थ गुरूकाकामहाराज

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव